Thursday, April 19, 2007

रवी किरणांनी दाखवला उजेडाचा मार्ग


ह्यात सर्वात जास्त लाभ झाला तो उपवर वधुंवराचा. डॉ. ऍना ट्यूबायूका, (कार्यकारी संचालक, संयुक्त राष्ट्र संघ ) यांना श्री सुभाष दळवी बरोबर ह्या प्रकल्पाची प्रत्यक्ष येवुन पाहाणी करावीशी वाटली असा हा मेघवाडी प्रकल्प, जोगेश्व्ररी येथे रवि किरण मंडळाने स्वयंसेवी पद्धतीने राबवुन रहिवासी आपण रहात असलेल्या विभागाचा किती कायापालट करु शकतो हे साऱ्या जगाला दाखवुन दिले.

२५ ते ३० ट्रक भरतील एवढा कचरा गणेश मैदानात जमा झाला होता. श्री सुभाष दळवीनी पुढाकार घेउन ह्या विभागात दत्तक वस्ती योजना राबवण्यास सुरवात केली. रहिवासी एकत्र आले, मैदान साफ झाले, मुलांना खेळायला कायम स्वरुपी जागा मिळाली, नगरसेवकानी व्रुत्तपत्र वाचनालय, लहान मुलांसाठी मनोरंजनाच्या वस्तु, व एक मंच बांधुन दिला,

हे सारे वाटते तेवढे सोपे नसते, लोकांची जन्मजात सवयी मोडणे, चांगल्या सवयी लावणे ह्या साठी सततचा पाठपुरावा करावा लागतो, नागरीकांत मिसळुन त्याचे प्रश्न जाणुन घेवुन त्याचे निरसन करावयाला लागते, विरोध सहन करायला लागतो, आरोपदोशारोपाला सामोरे जायला लागते, ह्या सफाई कामात पण राजकारण आणले जाते, लोक उपलब्ध असतील तेव्हा जावुन त्यांच्या सभा घ्याव्या लागतात. ह्यासाठी लागते ती अफाट चिकाटी, मने वळवण्याचे कौश्यल्य, प्रामाणीकपणा जो मी श्री. सुभाष दळवीत पाहिला.

अश्या रितीने ह्यात सर्वात जास्त लाभ झाला तो उपवर वधुंवराचा, अस्वच्छ विभागामुळे लग्न जमत नव्हती, अशांची लग्ने जमली, दुसरा फायदा असा की जागांचे, घरांचे भाव वाढले.

No comments: