आपण भारताचे प्रवेशद्वार, आर्थिक राजधानी असलेल्या, जगातील एका प्रमुख शहरात रहात आहोत. परंतु २१ व्या शतकात देखील हे एक बकाल शहर राहिले आहोत. आपल्या संवेदना एवढ्या बोथट झाल्या आहेत की रस्तावर, आपण रहात असलेल्या विभागात असणारे कचऱ्याचे ढिग, दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य, रस्तावरुन वहाणारे सांडपाणी, त्यांची डबकी, त्यातले डास, घुशी, सुरक्षीत चालायला नसणारे पदपाथ आणि असल्यास फेरीवाल्यांनी बळकवलेले किंवा लादिहीन केविलवाण्या स्थितीतील पदपाथ. रस्तावरील खड्डे , फोडलेले रस्ते, वहानांचे कर्कश भोंगे कारण नसतानाही वाजवणारे वाहनचालक, धुर ओकीत चाललेली वहाने कशाकशाचाही आपल्यावर परीणाम होत नाही किंबहुना ह्याची आपल्याला जाणिवच नसते.
अनेक वेळा समाजात बऱ्याच विभागात समविचारी नागरीक एकत्र येउन स्थानिक पातळी वरचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांना गरज असते ती मार्गदर्शनाची, मदतीची. आम्ही वर नमुद केलेले काही प्रश्न सोडवण्याकरता सतत महानगरपालिकेत तक्रारी वर तक्रारी करत होतो पण परीणाम शुन्य होता. अश्यावेळी केवळ तक्रारखोर न रहाता सकरात्मक द्रुष्टीकोन ठेवुन महानगरपालिकेसमवेत, वेळप्रसंगी पोलिसांची पण मदत घेउन श्री. सुभाष दळवीच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पाच बर्षापुर्वी केवळ सोडवलेच नव्हे तर कायमस्वरुपी दुर केले.
आणि जेव्हा नागरीक ह्या अभिनव लढ्यासाठी रस्तावर उतरतील तेव्हा आपले हे लाडके शहर मस्तपैकी वर्डक्लास झालेले बघायला मिळेल.
माझे म्हणणे हेच आहे दुसऱ्यांवर अबलंबुन राहु नका, आपले प्रश्न आपणच लोकसहभागाने सोडवा.
हे प्रश्न केवळ झोपड्पट्टीतच नसतात तर, तुमच्या आमच्या सारख्या मध्यमवर्गीय रहात असलेल्या, एवढेच काय तर श्रीमंत रहात असलेल्या विभागातही असतात.

No comments:
Post a Comment