खाडिलकर मार्ग, गिरगावातील एक घरगल्ली. कचरा लवकरच पहिल्या मजल्यापर्यंत पोचेल.
आणि आता हि आमची घरगल्ली
पुर्वीचा हा नमुना
पुर्वीचा हा नमुना
श्री सुभाष दळवी व माझे ॠणानुबंध जुळुन आले ते आम्ही रहात असलेल्या विभागातील नरकासमान असलेल्या घरगल्यांच्या समस्येचे कायमचे निवारण करण्यासाठी हाती घेतलेल्या स्वच्छ्तामोहीमेत. नागरीकांत मिळुन मिसळुन, परत त्यात आपल्या कार्यालयीन कामाचा त्यांचा समस्येसी काडीमात्र संबध नसुनही त्या सोडवण्यास चोवीस तास झटणारा, पदरचे पैसे खर्च करणारा, वेळ प्रसंगी त्रास सहन करणारा असा महानगरपालिकेचा अधिकारी मी माझ्या आयुष्यात प्रथमच पाहीला.
घरगल्ली म्हणजे दोन इमारती मधील मोकळी, रहिवाशांची घरात नको असणाऱ्या वस्तु , केरकचरा टाकण्याची हक्काची जागा, पिढ्यानपिढ्या ह्या जागेत कचरा टाकला जातो, तो साफ करण्यासाठी त्यात सफाई कामगार पण जावु शकत नाही, डोक्यावर काय पडेल, आपला पाय कशावर पडेल ह्याचा नेम नाही. आपले जीवन का बरे सफाई कामगारानी धोक्यात घालवे? मग आयुष्यभर ती घाण तशीच साठवली जाते, त्यात भर पडते इमारतीच्या फुटलेल्या की फोडलेल्या सांडपाण्याचा पाईपातुन पडणाऱ्या पाण्याची. मग ह्यात निर्माण होते ते मच्छर, घुशी राज्य. त्यात भर म्हणुन हयातुने गेलेले पिण्याचे पाईप घरात सांडपाणी मिसळत पिण्यावे पाणि आणतात, ह्यातुन मग ह्या सर्वांचा परीणाम म्हणुन पसरते ती रोगराई.
आमची ह्या पासुन सुटका करण्यासाठी आम्ही श्री. सुभाष दळवींची मदत घेतली. पहिल्याच झालेल्या सभेत श्री. सुभाष दळवींनी आपल्या वाणीने सर्व नागरीकांना मोहीत केले, प्रेरीत केले, आपला विभाग स्वच्छ करण्यासाठी झपाटुन टाकले.
ह्या दरम्यान ते रात्री अपरात्री केव्हाही ते आमच्या गल्लीत आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी अकस्मात हजर व्हायचे, मध्यरात्रीस दुरध्वनी करुन झोपेतुन उठवुन दुसऱ्या दिवशीचा बेत ठरवायचे. हे झोपतात का नाही असा प्रश्न पडायचा. त्याचा दुरध्वनी आला की समजायचे हे आता आपल्याला कामाला जुंपणार. पण हे काम असायचे आपल्या समाजासाठी, स्वःतासाठी वैयक्तिक स्वार्थ ह्यात कोठेच नसायचा.
मग जे घडले ती एक क्रांती होती. दुसऱ्या दिवसापासुन सर्वांनी घरगल्लीत कचरा टाकणे बंद केले, नागरीकांनी गटारात उतरुन ती साफ केली, १५-२०-२५ वर्षे साठलेला कचरा उपासला गेला, मुबंई महानगरपालिकेच्या मदतीने तो उचलला गेला, सांडपाण्याचे पाईप दुरुस्त केले गेले. घरगल्लीत टाकला जाणारा कचरा रोज घरात साठवु जावु लागला, रोज सकाळी दोन तास तो जमा करण्यासाठी डबे ठेवले जावु लागले, महानगरपालिका रोजच्या रोज ओला कचरा उचलु लागली, फोर्स नामक कचरा वेचणाऱ्याच्या संघटनेची मदत घेतली गेली. जमादार सुका कचरा घेउन जावु लागला, त्याला रोजीरोटी मिळाली.
ह्यात सर्वात मोठा सहभाग होता तो लहान मुलांनी केलेल्या लगान टिमचा. नागरीकांना सभेसाठी घरोघरी जावुन रस्तावर ऊतवण्यापासुन ते रस्तावर गस्त ठेवित, कचरा टाकणाऱ्यांना पकडुन पोलिस स्टेशन मध्ये नेण्यापासुन किंवा त्यांना आपणच ऊठाबशी काढणे, घाण साफ करणे ह्यासारखा शिक्षा देण्यात.
तात्पर्य काय तर जो पर्यंत तुम्हाला भयानकतेची जाणिव होत नाही तो पर्यंत तुम्ही झोपलेलेच असता पण जेव्हा श्री, सुभाष दळवींसारखी वक्ती ती जाणिव करुन देते तेव्हा तुम्ही झोपुच शकत नाहीत. अंधाराचा मुकाबला करण्यासाठी समई पेटवावीच लागते, तेथे तर मशालच पेटवली गेली.

ह्या मोहिमेत आम्हाला श्री. राजेद्र वळे, श्री होवाळे, श्री,गुरव, श्री. कोळी आदी महानगरपालिकेच्या D ward मधील अधिकाऱ्यांची फार मोलाची मदत झाली. त्याच्या शिवाय हे यश शक्य नव्हते.
No comments:
Post a Comment