एके काळी गणपती विसर्जनाच्या वेळी गणपतीच्या मुर्तीबरोबर हार, फुले देखिल सम्रुद्रात, तळ्यात, विहीरीत विसर्जित केले जायचे. जवळ जवळ १६०० टन फुले, हार ह्यापासुन होणाऱ्या प्रदुषणाचे प्रमाण ही तसेच मोठे होते.
ह्या परिस्थित धार्मिक भावना लक्षात घेवुन श्री सुभाष दळवींनी एक अभिनव योजना आखली. त्याचे नाव होते निर्माल्य कलश योजना. त्या अंतर्गत एक मोठा कलश चॊपाटीवर ठेवला गेला. मुर्ती विसर्जनापुर्वी निर्माल्य त्यात जमा केले जाते व ते खत बनवण्यासाठी पाठवले जाते. पाण्याचे होणारे प्रदुषण अश्या रितीने थांबले व दुसऱ्या दिवशी जागा साफ करण्याची जरुरी पण उरली नाही.
No comments:
Post a Comment