Wednesday, April 25, 2007

चमत्कार महात्मा कबीर नगर मधला


चमत्कार ! हो चमत्कारच !! ह्याला दुसरा शब्दच नाही, लोकसहभाग, महानगरपालिका, नगरसेवक व ह्यांना जुळवणारा सांधा श्री सुभाष दळवी एकत्र येतात तेव्हा जे काही घडते ते आधीची परीस्थिती व नंतरची ह्याची खात्री आपल्या डोळ्याने पाहुन करुन घ्यायची असते. दोन दिवसात आयुष्यभर कचरा सहन करणारी बिहीर अचानक मोकळा श्वास घेवु लागते तेव्हा तीचे मनोगत हर्षवायु शिवाय काय असु शकते ? आता तीचा कायमस्वरुपी लाभ घेणार ते जागे झालेले तेथेलेच रहीवासी. ही अभिनव कल्पना राबवली गेली मुबंई महानगरपालिकेच्या दत्तक वस्ती योजना अंतर्गत. अश्या प्रकारचा हा मुंबईतला पहीलाच प्रयत्न असावा. ह्याच बरोबर येथे रहणाऱ्या रहिवाश्यांचा पाण्याचा ही प्रश्न सुटावा. माझ्या माहीतीप्रमाणे मुंबईच्या महापौर सौ. शुभा राऊळ यांनी सुध्दा आपल्या शहरातील विहीरी ई. साफ करण्याचे ठरवले आहे
तो कसा सुरु झाला ते आपल्याला जाणुन घायचे असेल तर वाचा माझा आधीचा लेख.

No comments: