मला सांगा का श्रीमती हसीना शेख याचा चेहरा आनंदाने, अभिमानाने खुलुन येणार नाही ? त्या सर्वांनी आता पर्यंत खुप भोगले होते, सहन केले होते . आपल्या घराबाहेर पडलेले आपले पाउल हे एका कचरा डंपीग ग्राऊंड मधे पडलेले कोणास आवडत असेल? अर्थात ह्या ऊकिरडयामधे त्यांचा ही हाथ होता, नाही असे नाही, पण जेव्हा हे सामान्य नागरीक पेटुन श्री सुभाष दळवींच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येतात तेव्हा त्यांचे दुष्ट स्वप्न संपलेले असते.
ह्या कचरा डंपीग ग्राऊंडचे रुपांतर नव्हे कायापालट आपल्या डोळ्यादेखत, आपल्याच प्रयत्नाने एका सुंदरशा उद्यानात झालेले पाहुन मला सांगा का श्रीमती हसीना शेख याचा चेहरा आनंदाने, अभिमानाने खुलुन येणार नाही ? त्यात वरती त्यांनी ह्या जागेत होणारे अतीक्रमण दिवसरात्र पहारा करुन परतुन लावलेले. मग ह्या बागेत भाज्या पिकु लागतात, घरातल्या खरकट्या पासुन खत निर्मीती होते, आपल्या भागात शिवणकामाचे, संगणकाचे वर्ग सुरु होतात, बालवाडी सुरु होते, आपली मुले, मुली एक चांगले जीवन जगायला लागतात, ह्या योजनेमुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो, मग मला सांगा ...........
No comments:
Post a Comment