Thursday, May 31, 2007

इंदीरा नगर, लोकमान्य नगर, कुर्ला,


मिठी नदी. पावसाळा आला कि हिच्या आठवणीनी मुंबईकरांच्या छातीत धडकीच बसते. सध्या ह्या नदीची साफसफाई जोरात सुरु आहे, त्यामुळे ही नदी तर साफ होणारच आहे, परंतु परत यात केर कचरा पडून ती अडू नये, ती सतत वाहती रहावी या करता कायमस्वरुपी तोडगा हवा होता आणि तो काढला गेला मुबंई महानगरपालीकेच्या दत्तक वस्ती योजने अंतर्गत कुर्ला येथे, इंदीरा नगर, लोकमान्य नगर ते साईनाथ नगर या मिठी नदीवरील झोपडपट्टीमधे. आज येथे प्रत्येक घरासमोर कचरा टाकण्यासाठी कचऱ्याचे डबे ठेवले गेलेले आहेत, नदीत टाकला जाणारा कचरा आज या डब्यात पडतो मग तो वेळच्या वेळी गोळा केला जातो, संपुर्ण वस्तीतीतील रस्ते नियमीत पणे झाडले जावु लागले. अजुन खुप मजल मारायची बाकी आहे, सुरवात तर चांगली झाली आहे.
अर्थातच या सर्वामागचे किमयागार आहेत ते श्री.सुभाष दळवी.

2 comments:

आशा जोगळेकर said...

मिठी नदी ची स्वच्छता होते आहे हे वाचून एव्हढं बरं वाटलं, तसंच नाले व गल्लयांच्या स्वच्छते कडे ही लक्ष दिलं जातंय हे वाचूनही . माहिती बद्दल आभार.

Deepa Kuber said...

thanks, will check those blogs too.