Saturday, May 05, 2007

विहीरींच्या शोधात मुंबईकर


दि. ४ मे रोजीच्या मुबंई वृत्तान्त मधे " विहीरींच्या शोधात मुंबईकर ! " हा लेख वाचला. महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी " मुबंईतील या जुन्या विहीरीचे योग्य प्रकारे जतन आणि संवर्धन केले गेले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. आता त्यांनीच पुढाकार घेवुन हे कार्य हाती घ्यावे जेणे करुन मुबंईतील भेडसावणाऱ्या पाण्याचा बिकट प्रश्न काही प्रमाणात सुटु शकतो.
लोकसहभाग, नगरसेवक श्री. नितीन सलागरेचा पुढाकार, मुबंई महानगरपालिका, व तिचे अधिकारी श्री सुभाष दळवी यांनी एकत्रपणे महानगरपालिकाच्या दत्तक वस्ती योजने अंतर्गत, महात्मा कबीर नगर, सहार रोड, अंधेरी येथील कचऱ्यानी, गाळानी, पुर्ण भरलेली विहिर दि. २०-०४-०७ ते २३-०४-०७ या केवळ दोन-तीनच दिवसात संपुर्णपणे साफ करुन मुंबई समोर एक आदर्श उभा केला आहे. समाजातील हे सर्व घटक एकत्र येतात तेव्हा जे काही घडते तो चमत्कारच असतो. दोन दिवसात आयुष्यभर कचरा सहन करणारी बिहीर अचानक मोकळा श्वास घेवु लागली आहे, आता तीचा कायमस्वरुपी लाभ घेणार ते जागे झालेले तेथेलेच रहीवासी. अश्या प्रकारचे प्रयत्न तर सर्वत्र व्हायला हवे आहेत.
यापासुन प्रेरणा घेवुन सर्वत्र हे पाण्याचे जुने स्त्रोत साफ केले जातील अशी अपेक्षा.

No comments: