Thursday, April 19, 2007

सुरुची महिला मंडळ.




ह्यात सर्वात मोठा तोटा झाला तो डॉक्टरांचा. घरातील आजारांचे प्रमाण घटले, दवाखाने ओस पडु लागले, हा सर्व दोष होता सुरुची महिला मंडळचा, श्री. सुभाष दळवीचा. महिलांना अबला कशासाठी म्हणायचे ? सुरुची महिला मंडळाने प्रेमनगर, गोरेगाव, ह्या आपल्या झोपडपट्टीत जी क्रांन्ती घडवुन आणली त्याला तोड नाही.


सर्व ठिकाणाच्या स्वच्छ्तेच्या समस्या जवळजवळ सारख्याच असतात. घरातील घाण, कचरा, खरकटे, रस्तावर आपणच भिरकवुन द्यायचे, लहान मुलांना नैसर्गिक विधी साठी घराबाहेर दारात, रस्तावर बसवायचे, त्यात परत आपण काही गैर करतो आहे ह्याची जाणीव नसणे व त्यात आपले कोणी काय वाइट करणार ही मग्रुर व्रुत्ती, गटारे नाले सर्व घाणीने भरलेली, सांडपाणि साठलेले, उदीर, घुशी, डास. अनारोग्य, पावसाळ्यात निसर्ग हे सारे तुम्हालाच परत करणार, ही घाण, सांडपाण्यासकट तुमच्याच घरात परत येणार.
नकोसे झालेले हे सारे दुष्टचक्र भेदण्याचे सुरुची महिला मंडळाच्या महिलांनी ठरवले, इच्छा तर होती पण मार्ग सापडत नव्ह्ता, नगरसेवक, पालिका अधिकारी अनेकांची दारे ठोठवुन झाली, पण ....... ? अखेरीस त्यांना अंधारात दिवा सापडला, त्याची भेट श्री. सुभाष दळवीशी झाली मग सुरु झाला क्रांतीचा मार्ग. आता परत फिरणे नाही, स्थानिकांच्या बैठका वर बैठका श्री दळवींनी घेण्यास सुरवात केली, काय केले पाहीजे, कसे केले पाहिजे ह्या संबधी योग्य मार्गदर्शन केले, सर्व महिला पुढे सरसावल्या, घरोघरी जावुन प्रबोधन केले, नागरीकांनी श्रमदानाने, पालिका सफाइ कामगारांच्या मदतीने, कचऱ्याचे डोंगर उपसले, नाले साफ केले, जीवन जगण्याची एक नव्याने सुरवात झाली.
स्वच्छ्तेचे नियम करण्यात आले, रस्तावर, नाल्यात पडणारा कचरा, कचराकुंडीत ठरावीक वेळेत जमा होण्यास सुरवात झाली, नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाइ करण्यात आली, रस्ता बळकवलेल्या दुकानदारांवर , मॅकॅनीकवर कारवाइ झाली रस्ता मोकळा झाला.अनेक मान्यवरांनी प्रेमनगरला भेट देवुन सुरुची महिला मंडळाचे कौतुक केले.


आपण ह्या पासुन कधी बोध घेणार ?

No comments: