Tuesday, April 17, 2007

प्लास्टीकचा भस्मासुर हद्द्पार करण्यासाठी

हे तर धर्मसंकटच. ग्राहक पिशव्या आणत नाहीत आणि श्री. सुभाष दळवीनी तर प्लास्टीकच्या पिशव्यांमध्ये भाजी न देण्यासाठी मन वळवलेले. ह्यात तोडगा काय? हे सहजशक्य करुन दाखवले , गॅटरोड रेल्वे स्थानकाबाहेरील, नानाचौक जवळील भाजी गल्लीतील भाजी विक्रेतांनी. श्री सुभाष दळवी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली एक अभिनव योजना आखली पिशव्या हद्दपार करायवी.

दर वर्षी पावसाळ्यात रस्तांवर पाणी तुंबले की मग ओरड सुरु होते ती , पाण्याचा निसरा होण्याच्या मार्गांमद्धे अडकलेल्या, आम्हीच बेजबाबदारपणे, बेदरकारपणे फेकलेल्या प्लास्टीकच्या पिशव्यांविरुद्ध. त्यात भर पडते ती भाजीपाल्याच्या कचऱ्याची. दुर्गंधी तर विचारु नका.
कायद्याने तर आता २० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या पिशव्यावर बंदी आणली आहे. कायदा करु शकत नाही ते सहजशक्य करुन दाखवले , गॅटरोड रेल्वे स्थानकाबाहेरील, नानाचौक जवळील भाजी गल्लीतील भाजी विक्रेतांनी. ही भाजी मंडई मुंबईतील सर्वात मोठी असावी. जवळजवळ दोन-अडिचशे भाजी विक्रेते प्लास्टीकच्या पिशव्या हद्दपार करण्यासाठी श्री सुभाष दळवींनी एकत्र आणले. ०१-०४-२००२ पासुन प्लास्टीकच्या पिशव्या विक्रेतांनी ग्राहकांना देणे बंद केले. हे सर्व भाजीविक्रेत्यांना समजवुन सांगण्यासाठी श्री. दळवींना खुप प्रयास करावयाला लागले त्या साठीचे आमिष होते प्लास्टीकच्या पिशव्यांसाठी दरोरोजचे खर्च करायला लागणारे ५० ते ६० रुपये, ( महिन्याला दीड हजार) वाचवणे व ते बचत करणे.
भाजी देण्यास कापडी पिशव्या शिवण्यात आल्या, त्यातुन मानसी महिला मंडळाला रोजगार मिळाला, ह्या कापडी पिशव्या ग्राहकांना नाममात्र १० रुपायाची अनामत रक्कम घेवुन देण्यात आल्या. भाजीचा कचरा जो रोज रस्तावर पडायचा तो साठवण्यासास वर्गणी काढुन हिरव्या रंगाचे प्रत्येक विक्रेत्यासाठी डबे आणले गेले. डब्यात साठलेला कचरा उचलणे महानगरपालिकेस सोपे पडु लागले तो रोजच्या रोज उचलु लागला.
आणि बघता बघता मुबंई समोर भाजी गल्लीने एक आदर्श ठेवला.

No comments: