लोकसहभागाचा आंनद द्विगुणीत करताना
निवडणुकीत दिलेली आश्वासने, वचने ही विनाविलंब पाळण्यासाठीच असतात, हे मुंबईच्या महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी शिवाजी नगर, बोरीवली मधे सप्रमाण सिध्द करुन दाखवले. योजनेला प्रारंभ केल्यापासुन अवघ्या दहा दिवसात, फक्त दहा दिवसात संपुर्ण शिवाजी नगर स्वच्छ झाले. महापौरांचा पुढाकार, श्री. सुभाष दळवींचे यशस्वी मार्गदर्शन, श्री. बाळकॄष्ण ढमाले, प्रल्हाद नाईक , सरोज ठाकुर, मुकेश सिंग, प्रमोद तिवारी, शिवप्रकाश तिवारी, सुनिता गायकवाड, बाबु शैख, वसंत कुंभेकर, रतन चौधरी, आरती कोरगावकर आदी कार्यकर्त्यांचे कठोर परीश्रम यातुन साकारली सुंदर वसाहत. आज संपुर्ण कायापालट येथे झालेला आहे. गंमत म्हणजे या सर्वाचा खर्च महानगपालीके साठी फक्त शुन्य रुपये आला.
यंदालाच हे शिवाजी नगर महापौरांच्या विभागाला जोडले गेले, या वस्तीत प्रचार करताना , नागरीकांची अस्वच्छ्तेपासुन, घाणीपासुन मुक्तता करण्याचे आपले वचन त्यांनी पाळुन मुंबई समोर आदर्श उभा केला आहे. आज ही वसाहत पाहील्यानंतर कोणे एके काळी याची अवस्था अतिशय वाईट होती हे सांगीतल्यावर विश्वास बसणे कठीण आहे. जर दहा दिवसात हे साकारले गेले तर आपण सर्वांनी मनावर घेतल्यावर आपले शहर सुंदर व स्वच्छ होण्यास वेळ लागणे कठिण आहे.
आज येथे सर्वप्रथम नागरीकांची मानसीकता सभा, घरोघरी प्रचार करुन तसेच पोस्टर्स, स्टिकर्स द्वारे बदलली गेली, मशीदी मधुन शुक्रवारी नमाजाच्या वेळी साफसफाई चे महत्व, "सफाई आधा ईमान" याचा कुराणातील दाखला देत धर्मगुरुंच्या मार्फत सांगीतले गेले, म.न.पा.च्या सर्व खात्यात समन्वय साधत त्यांची मदत घेण्यात आली, पेस्ट कन्ट्रोल करण्यात आले, डासांसाठी धुर फवारणी कण्यात आली, त्यानंतर घाणीचे, मातीचे ढिगरे उपसले गेले, नाले, ड्रेनेज सफाई करण्यात आली, शौचालये साफ करण्यात आली, संडासाच्या तुंबलेल्या टाकीत बी.टी.ऐम. सोल्युशन टाकण्यात आले जेणे करु त्या रित्या झाल्या, दुर्गंधी दुर झाली, पाण्याच्या टाक्या साफ केल्या गेल्या, त्या मुळे रस्तावर नैसर्गीक विधी करणे थांबले, विहीरीतील साठलेला केरकचरा काढला गेला, विहीरीचे पाणी रोजच्या कामासाठी वापरात येवु लागले, प्रत्येक दुकानदारांनी आपल्या दारा समोर लाल रंगाचे डबे ठेवण्यास सुरवात केली , रस्ते वेळच्यावेळी झाडले जावु लागले. कायदे न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, वैशिष्ट म्हणजे हे सारे येथील नागरीकांनी, लोकसहभागातुन केले. जीवन आधार फाउंडेशनने १५ सफाईमित्र उपलब्ध करुन दिले, ज्यांनी संपुर्ण वस्ती सर्वप्रथम साफ केली, व त्यानंतर ती दररोज साफ ठेवु लागले.
शिवाजी नगरला प्रभाग समीतीच्या अध्यक्षा सौ. सुजाता पाटेकर यांनी भेट दिल्यानंतर, प्रभावीत होत, ह्या पासुन प्रेरणा घेत त्यांनीही आपल्या विभागात ह्याच धर्तीवर स्वच्छता मोहीम राबवायचे ठरवले आहे.
मुळातच नागरीकांना जाणीव करुन देण्याची गरज असते. ही कला श्री. सुभाष दळवींना चांगलीच अवगत आहे. त्यांचे लोकांमधे मिसळणे, लोकांच्या सोईनुसार रात्री, अपरात्री त्यांच्या सभा घेवुन त्यांना चेतावणे (अर्थात चांगल्या कामासाठीच), व हे सारे घडत असताना, साऱ्या कामाचा महापौरांकडुन सतत पाठपुरावा होत असल्यामुळे व सतत आढावा घेणे होत असल्यामुळे हे सारे केवळ दहा दिवसात शक्य झाले.
आणि हो, आता या येथील अस्वच्छतेमुळे होणाऱ्या रोगराईंचे प्रमाणही घटले आहे, याची कबुली तेथेलेच डॉक्टरच देतात.