Sunday, June 10, 2007

पर्यावरणरत्न


श्री. सुभाष दळवी यांना आज कै.मनोहर विचारे प्रतिष्ठान तर्फे मुंबईच्या महापौर डॉ. सौ. शुभा राऊळ यांच्या हस्ते, त्याच्या कामाची दखल घेत "पर्यावरणरत्न " या पुरस्कार देण्यात आला. मुंबई महानगरपालीकेच्या दत्तक वस्ती योजनेअंतर्गत आज अनेक वराहतींचे रुप पालटले आहे, अनेकांना आज रोजगाराची संधी मिळाली आहे, या योजनेचे शिल्पकार म्हणुन श्री. दळवी यांचा सत्कार करण्यात आला,

Friday, June 01, 2007

तरुण खासदार श्री. मिलींद देवरा व दक्षिण मुंबईतील घरगल्ल्यांच्या समस्या


तरुण खासदार श्री. मिलींद देवरा, यांनी दक्षिण मुंबईतील घरगल्ल्यांच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यास निवडुन आल्यानंतर पुढाकार घेवुन आपल्या विकास निधीतुन अनेक ठिकाणी घरगल्या नुतनीकरण व सांडपाण्याचे पाईप दुरुस्तीची कामे सुरु केली. मी रहात असलेल्या गल्लीमधे व मागच्या तसेच बाजुच्या गल्लीत ही त्यांनी आपल्या निधीतुन संपुर्ण घरगल्ल्या दुरुस्त केल्या आणि नरकातुन आमची मुक्तता केली. कारण कितीही त्या साफ केल्यातरी त्यांची अवस्था वाईटच होती. आज अनौपचारीक समारंभात ते आमच्या गल्लीत आले होते.


आमच्या अडीअडचणी सोडवणारे असे खासदार आम्हाला लाभले हे आमचे भाग्य.