Friday, November 20, 2009

प्लॅस्टीकच्या कॅरी बॅगचा मोह टाळा

जमावाला, झुंडीला संमोहीत करुन त्यांना आपल्याला जे हवे ते त्याना करायला लावण्याची कला फार मोजक्या लोकांना अवगत असते. हा भारलेला जमाव काय करत असतो याची अनेक उदाहरणे आपण डोळ्यासमोर बघत असतो , या घटनांचे आपण साक्षीदार असतो.

पण हे असे जादुगार त्या समाजातील घटकांना एक व्यक्‍त्ती म्हणुन त्यांचे अस्तित्व कायम ठेवुन जेव्हाका भुरळ पाडत असतात तेव्हा त्यांच्या हाती काहीतरी विधायक कार्य होत असते , काही तरी असे नवनिर्माण होत असते, जे अनेक कायदे करुन ही किंवा असलेल्या कायद्यांची अगदी काटॆकोरपणे अंमलबजावणी करुन देखील होण्यासारखे नसते.

बहुतेक सर्वच वेळा काय केले जावु नये हेच सांगितले जाते. पण जेव्हा त्याच बरोबर तुम्ही या प्लास्टीकच्या कॅरी बॅग वापरु नकात , त्या ऐवजी आम्ही तुम्हाला सहज माफक किमतीत उपलब्ध करुन दिलेल्या या कापडाच्या पिशव्या वापरा असे समजवुन सांगितले जाते , तेव्हा माणसे ते आनंदाने ऐकतात. मतपरिवर्तन होवुन भाजी विक्रेते, दुकानदार प्लास्टीकच्या कॅरी बॅग ठेवणॆ बंद करतात, आणि त्यामागे वर्षाकाठी खर्च होणारा पैसा बचत करतात.

विलेपार्ल्यात जर का तुम्हाला भाजीवाल्यांनी, उपहारगृहवाल्यांनी प्लॅस्टीकच्या कॅरी बॅग दिल्या नाहीत तर त्यांच्याशी भांडु नकात, उलट ते व आपण पर्यावरण रक्षणासाठी कुठेतरी हातभार लावत आहोत या जाणीवेने खुश व्हा. तसेच आपल्यामुळे अनेकांना या कापडी पिशव्या तयार करण्याचा रोजगार मिळाला आहे या भावनेने फिल गुड करा .

वापरल्यानंतर जेव्हा या कॅरी बॅग्स रस्तात, गटारात, घरगल्यांमधे बेदरकारपणे फेकल्या जातात तेव्हा काय होते याचा अनुभव मुंबईनी एकदा चांगलाच घेतला आहे. त्याच बरोबर यांचा वापर मनात आणले तर बंद होवु शकतो अश्या प्रकारची अनेक उदाहरणे आहेत.

हि सारी किमया आहे , श्री. सुभाष दळवी नामक अवलियाची. मुंबई शहर हे स्वच्छ, सुंदर करण्याचा ध्यास घेतलेल्या एका महानगरपालिकेत काम करत असुन आपल्या चाकोरी बाहेर जावुन हे असे अनेक प्रकल्प राबवणाऱ्याची. काही वर्षापुर्वी ग्रॅंटरोड ला भाजीगल्लीत सुरु झालेली हि मोहिम आता विलेपार्ल्यात पोचली आहे. हा प्रकल्प येथे गेले सहा महिने राबवला जात आहे.

आता ते मुंबईत अनेक विभागात या प्रकल्प घेवुन जाणार आहेत.