Thursday, May 31, 2007

शिवाजी नगर, बोरिवली - फक्‍त दहा दिवस कायापालट होण्यासाठी


सफाईमित्रांचे कौतुक करताना मुंबईच्या महापौर डॉ. शुभा राऊळ

लोकसहभागाचा आंनद द्विगुणीत करताना








नागरीकांच्या समावेत श्री दळवी व शाखाप्रमुख श्री. बाळकॄष्ण ढमाले




नाला साफ झाल्यावर

विहीर स्वच्छ झाल्यानंतर

घाणीचे डोंगर उपसताना





नाला साफ होवु लागला

भाजीवाल्यांचे डबे आनंदाने न्याहाळताना







निवडणुकीत दिलेली आश्वासने, वचने ही विनाविलंब पाळण्यासाठीच असतात, हे मुंबईच्या महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी शिवाजी नगर, बोरीवली मधे सप्रमाण सिध्द करुन दाखवले. योजनेला प्रारंभ केल्यापासुन अवघ्या दहा दिवसात, फक्त दहा दिवसात संपुर्ण शिवाजी नगर स्वच्छ झाले. महापौरांचा पुढाकार, श्री. सुभाष दळवींचे यशस्वी मार्गदर्शन, श्री. बाळकॄष्ण ढमाले, प्रल्हाद नाईक , सरोज ठाकुर, मुकेश सिंग, प्रमोद तिवारी, शिवप्रकाश तिवारी, सुनिता गायकवाड, बाबु शैख, वसंत कुंभेकर, रतन चौधरी, आरती कोरगावकर आदी कार्यकर्त्यांचे कठोर परीश्रम यातुन साकारली सुंदर वसाहत. आज संपुर्ण कायापालट येथे झालेला आहे. गंमत म्हणजे या सर्वाचा खर्च महानगपालीके साठी फक्त शुन्य रुपये आला.


यंदालाच हे शिवाजी नगर महापौरांच्या विभागाला जोडले गेले, या वस्तीत प्रचार करताना , नागरीकांची अस्वच्छ्तेपासुन, घाणीपासुन मुक्तता करण्याचे आपले वचन त्यांनी पाळुन मुंबई समोर आदर्श उभा केला आहे. आज ही वसाहत पाहील्यानंतर कोणे एके काळी याची अवस्था अतिशय वाईट होती हे सांगीतल्यावर विश्वास बसणे कठीण आहे. जर दहा दिवसात हे साकारले गेले तर आपण सर्वांनी मनावर घेतल्यावर आपले शहर सुंदर व स्वच्छ होण्यास वेळ लागणे कठिण आहे.



आज येथे सर्वप्रथम नागरीकांची मानसीकता सभा, घरोघरी प्रचार करुन तसेच पोस्टर्स, स्टिकर्स द्वारे बदलली गेली, मशीदी मधुन शुक्रवारी नमाजाच्या वेळी साफसफाई चे महत्व, "सफाई आधा ईमान" याचा कुराणातील दाखला देत धर्मगुरुंच्या मार्फत सांगीतले गेले, म.न.पा.च्या सर्व खात्यात समन्वय साधत त्यांची मदत घेण्यात आली, पेस्ट कन्ट्रोल करण्यात आले, डासांसाठी धुर फवारणी कण्यात आली, त्यानंतर घाणीचे, मातीचे ढिगरे उपसले गेले, नाले, ड्रेनेज सफाई करण्यात आली, शौचालये साफ करण्यात आली, संडासाच्या तुंबलेल्या टाकीत बी.टी.ऐम. सोल्युशन टाकण्यात आले जेणे करु त्या रित्या झाल्या, दुर्गंधी दुर झाली, पाण्याच्या टाक्या साफ केल्या गेल्या, त्या मुळे रस्तावर नैसर्गीक विधी करणे थांबले, विहीरीतील साठलेला केरकचरा काढला गेला, विहीरीचे पाणी रोजच्या कामासाठी वापरात येवु लागले, प्रत्येक दुकानदारांनी आपल्या दारा समोर लाल रंगाचे डबे ठेवण्यास सुरवात केली , रस्ते वेळच्यावेळी झाडले जावु लागले. कायदे न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, वैशिष्ट म्हणजे हे सारे येथील नागरीकांनी, लोकसहभागातुन केले. जीवन आधार फाउंडेशनने १५ सफाईमित्र उपलब्ध करुन दिले, ज्यांनी संपुर्ण वस्ती सर्वप्रथम साफ केली, व त्यानंतर ती दररोज साफ ठेवु लागले.

शिवाजी नगरला प्रभाग समीतीच्या अध्यक्षा सौ. सुजाता पाटेकर यांनी भेट दिल्यानंतर, प्रभावीत होत, ह्या पासुन प्रेरणा घेत त्यांनीही आपल्या विभागात ह्याच धर्तीवर स्वच्छता मोहीम राबवायचे ठरवले आहे.
मुळातच नागरीकांना जाणीव करुन देण्याची गरज असते. ही कला श्री. सुभाष दळवींना चांगलीच अवगत आहे. त्यांचे लोकांमधे मिसळणे, लोकांच्या सोईनुसार रात्री, अपरात्री त्यांच्या सभा घेवुन त्यांना चेतावणे (अर्थात चांगल्या कामासाठीच), व हे सारे घडत असताना, साऱ्या कामाचा महापौरांकडुन सतत पाठपुरावा होत असल्यामुळे व सतत आढावा घेणे होत असल्यामुळे हे सारे केवळ दहा दिवसात शक्य झाले.

आणि हो, आता या येथील अस्वच्छतेमुळे होणाऱ्या रोगराईंचे प्रमाणही घटले आहे, याची कबुली तेथेलेच डॉक्टरच देतात.

इंदीरा नगर, लोकमान्य नगर, कुर्ला,


मिठी नदी. पावसाळा आला कि हिच्या आठवणीनी मुंबईकरांच्या छातीत धडकीच बसते. सध्या ह्या नदीची साफसफाई जोरात सुरु आहे, त्यामुळे ही नदी तर साफ होणारच आहे, परंतु परत यात केर कचरा पडून ती अडू नये, ती सतत वाहती रहावी या करता कायमस्वरुपी तोडगा हवा होता आणि तो काढला गेला मुबंई महानगरपालीकेच्या दत्तक वस्ती योजने अंतर्गत कुर्ला येथे, इंदीरा नगर, लोकमान्य नगर ते साईनाथ नगर या मिठी नदीवरील झोपडपट्टीमधे. आज येथे प्रत्येक घरासमोर कचरा टाकण्यासाठी कचऱ्याचे डबे ठेवले गेलेले आहेत, नदीत टाकला जाणारा कचरा आज या डब्यात पडतो मग तो वेळच्या वेळी गोळा केला जातो, संपुर्ण वस्तीतीतील रस्ते नियमीत पणे झाडले जावु लागले. अजुन खुप मजल मारायची बाकी आहे, सुरवात तर चांगली झाली आहे.
अर्थातच या सर्वामागचे किमयागार आहेत ते श्री.सुभाष दळवी.

Saturday, May 05, 2007

विहीरींच्या शोधात मुंबईकर


दि. ४ मे रोजीच्या मुबंई वृत्तान्त मधे " विहीरींच्या शोधात मुंबईकर ! " हा लेख वाचला. महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी " मुबंईतील या जुन्या विहीरीचे योग्य प्रकारे जतन आणि संवर्धन केले गेले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. आता त्यांनीच पुढाकार घेवुन हे कार्य हाती घ्यावे जेणे करुन मुबंईतील भेडसावणाऱ्या पाण्याचा बिकट प्रश्न काही प्रमाणात सुटु शकतो.
लोकसहभाग, नगरसेवक श्री. नितीन सलागरेचा पुढाकार, मुबंई महानगरपालिका, व तिचे अधिकारी श्री सुभाष दळवी यांनी एकत्रपणे महानगरपालिकाच्या दत्तक वस्ती योजने अंतर्गत, महात्मा कबीर नगर, सहार रोड, अंधेरी येथील कचऱ्यानी, गाळानी, पुर्ण भरलेली विहिर दि. २०-०४-०७ ते २३-०४-०७ या केवळ दोन-तीनच दिवसात संपुर्णपणे साफ करुन मुंबई समोर एक आदर्श उभा केला आहे. समाजातील हे सर्व घटक एकत्र येतात तेव्हा जे काही घडते तो चमत्कारच असतो. दोन दिवसात आयुष्यभर कचरा सहन करणारी बिहीर अचानक मोकळा श्वास घेवु लागली आहे, आता तीचा कायमस्वरुपी लाभ घेणार ते जागे झालेले तेथेलेच रहीवासी. अश्या प्रकारचे प्रयत्न तर सर्वत्र व्हायला हवे आहेत.
यापासुन प्रेरणा घेवुन सर्वत्र हे पाण्याचे जुने स्त्रोत साफ केले जातील अशी अपेक्षा.